पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०१ : महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर संघटक प्रदीप माने यांच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा मेळावा दि. २९ रोजी आकुर्डी येथे महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे पिंपरी चिंचवड शहर संघटक श्री. प्रदीप माने यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम करणार असल्याचे पिंपरी चिंचवड शहर संघटक प्रदीप माने यांनी सांगितले. यावेळी श्री. रणजित शिरोळे, साईनाथ बाबर, श्री.हेमंत संभुस, सचिन चिखले,आजम खान (उद्योजक),सीमाताई बेलापूरकर,राजू साळवी,अमेय जोशी,कल्पेश परमार आदी मान्यवर उपस्थित होते.












