पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०४ : स्वप्निल उर्फ बिट्या संजय कुचेकर आणि त्याच्या इतर ०७ साथीदारांविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली आहे. ही घटना हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर ( वय २३ वर्षे, रा. मांजराई मंदीरा शेजारी मांजराईनगर मांजरी बु, पुणे ), पंकज गोरख वाघमारे ( वय २८ वर्षे, रा. बंटर शाळेजवळ गाडीतळ हडपसर पुणे ), हर्षल सुरेश घुले ( वय २३ वर्षे, रा. शिवाजी पुतळया शेजारी मांजरी बु,पुणे ) यांच्यासह ०३ विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या घरासमोर गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक आली असता आरोपींना स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितले. याचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी यांना लोखंडी रोड व दांडक्याने मारहाण केली. तसेच त्यांना पकडून ठेवत हातातील लोखंडी रॉड व दांडगे हवेत फिरवून मोठमोठ्याने धमक्या देत परिसरात दहशत निर्माण केली आहे.
आरोपींनी शहरात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी घातक शस्त्र बाळगून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांना कोयता दाखवत त्यांना दारू पिण्यासाठी दमदाटी करून पैसे मागणे, छोटे व्यावसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करून त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे आणि फुकट वस्तू घेऊन जाणे अशा अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपातील गुन्हे केलेले आहेत. त्यांच्याविरुद्ध पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
आरोपींविरोधात भादवि कलम ३०७,३२४,३२३,५०४,५०६,१४१,१४६,१४७,१४८,१४९, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ सन १९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ), ३ ( २ ), ३ ( ४ ) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर श्रीमती अश्विनी राख या करत आहेत.
मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री.रंजन कुमार शर्मा यांनी दिलेल्या आदेशावरून हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र शेळके पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ चे श्री. विक्रांत देशमुख यांच्या अधिपत्याखाली आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ५ पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख, मा.सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, श्रीमती अश्विनी राख, यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. रविंद शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे). श्री. विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री संदिप शिवले म. सहा.पोलीस निरीक्षक सारिका जगताप, सहा. पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, गिरीश एकोर्गे, महेश उबाळे, राजश्री खैरे वसीम शेख, बाबा शिंदे, अशोक आंधारे सर्व हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कारवाई केली आहे.












