लोणावळा : पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणावळा परिसर नशा मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून संकल्प नशा मुक्ती उपक्रम राबवण्याचा निश्चय केला आहे. या उपक्रमांतर्गत पाच किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
“भागो और नशा भगाओ” या संकल्पनेतून या उपक्रमणाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या काळात अंमली पदार्थ, दारू विक्री, नशील्या पदार्थांची तस्करी, अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये या पदार्थांचे ग्रहण करणे वाढल्याचे निदर्शनास आले आहे. समाजात आणि मुखतः तरुणाईत वाढत्या नशेच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या आणि संबंधित विषयाच्या जनजागृतीच्या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
चार जून रोजी सकाळी सहा वाजतेच्या सुमारास दाउदी बोहरा ग्राउंड, लोणावळा येथे या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रम संबंधित माहिती ग्रामीण पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल द्वारे जाहीर केली आहे. नागरिकांना या उपक्रमात सामील होण्याचे आव्हान देखील यावर करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांचा संकल्प नशा मुक्ती उपक्रम












