पुणे | प्रतिनिधी दि. ०९ : वाहनाची चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी रोहित पांडुरंग शिंदे ( वय ४२, रा. रेंजहिल्स, खडकी,पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील सादल बाबा बस स्टॉप येथे मोटर सायकलची चोरी करणारा आरोपी थांबलेला असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या बातमीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आरोपी पोलिसांना पाहून पळून जात होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडुन जेरबंद केले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सादल बाबा चौक येरवडा येथून गाडी चोरी केली असल्याचे कबूल केले आहे.
आरोपी विरोधात भादवी कलम ३७९ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.त्याच्याकडून दोन गुन्ह्यातील एकूण ८५,००० हजार किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती कांचन जाधव, पोलीस निरीक्षक, श्री. जयदिप गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांनी केलेली आहे.












