रविवारी पुरस्कार वितरण : कविसंमेलन, गझल संमेलनाचे आयोजन
पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १७ : करम प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या करम साहित्यतेज पुरस्कारासाठी प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांची निवड करण्यात आली असून पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 19 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रम सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्कार वितरण ज्येष्ठ साहित्यिका डॉ. उमा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. प्रज्ञा महाजन आणि वर्षा कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन व गझल संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
कविसंमेलनात चंचल काळे, अनुराधा काळे, डॉ. दाक्षायणी पंडित, अश्विनी देशपांडे, माधुरी डोंगळीकर, अश्विनी जगताप, ऋचा कर्वे, मुक्ता भुजबले तर गझल संमेलनात मिलिंद छत्रे, शांताराम खामकर, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे, सुजाता पवार, वर्षा कुलकर्णी, मसूद पटेल, डॉ. मंदार खरे यांचा सहभाग असणार आहे. प्राजक्ता वेदपाठक आणि वैजयंती विंझे-आपटे यांचा विशेष सहभाग असणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन व वासंती वैद्य करणार आहेत.












