पुणे, दि. १७ : महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाच्या आदेशानुसार निलेश भदाने यांची उप आयुक्त वा पदावर महापालिकेत नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने त्यांना रूजु करून घेतले असून त्यांचेकडे मध्यवर्ती भांडार विभागाची स्वतंत्र जबाबदारी सोपविली आहे. तर मनोज लोणकर यांचेकडे माहिती व जनसंपर्क विभाग आणि अग्निशमन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आकुर्डी रूग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांची सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
अणुविद्युत आणि दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता नरोन्हा थॉमस हे २० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत रजेवर जाणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने त्यांच्याकडील रजा कालावधीतील कामाचा कार्यभार विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता नितीन देशमुख यांच्याकडे सोपविला असून त्याबाबतचा आदेश निर्गमित केलेला आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप आयुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली.












