येरवडा वाहतूक विभागाच्या हद्दीत नागपूरचाळ गल्ली क्र १ ते गल्ली क्र ४ तसेच येरवडा जेल भिंतीलगत नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे ३० जून २०२३ पासून १३ जून २०२३ पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.












