मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारवरील ताबा सुटल्याने कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर यामध्ये 5 वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी पालघरच्या मेंढवन घाटात हा भीषण अपघात झाला. यामध्ये काहीजण पुण्याचे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
समोर मोठे वळण आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तिघेही एकाच कुटुंबातील होते. तसेच या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.यामध्ये संपूर्ण कारचा चुराडा झाला असून य अपघातात हर्षद गोडबोले (वय 42), आनंदी गोडबोले (वय 5) आणि वाहन चालक मिलिंद वैद (वय 43) यांचा मृत्यू झाला आहे. तर हर्षदा गोडबोले (वय 37), अद्वैत गोडबोले ( वय 12) अशी जखमींची नावे आहेत.












