इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा. लि., काळेवाडी, पुणे या फ्लिपकार्ट च्या हबमधील मॅनेजर यांनी हबमधील कामगार यांनी ९,४७,१६० /- रुपये किं.चे विविध कंपनीचे एकुण ३८ मोबाईल चोरी केले बाबत वाकड पोलीस ठाणे येथे दि. १८ रोजी तक्रार केली होती त्यांच्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी गु.र.नं. १११३ / २०२३ भा.द.वि. कलम ३८९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्ह्यातील आरोपी व त्याचे इतर साथिदार यांचा शोध घेऊन गुन्हयातील चोरीस गेलेले मोबाईल फोन जप्त करणेबाबत पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे यांनी वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दाखल गुन्ह्याचे तपासाचे आदेश वाकड पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी यांना दिले. त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक व पांरपारीक पध्द्तीने तपास सुरु केला. दसरा व दिवाळी चे पुर्वी फ्लिपकार्ट मध्ये ‘बिग बिलीयन डेज’ हा सेल असतो. त्या काळात ग्राहकांची खरेदीचे प्रमाण वाढलेले असते, त्यामुळे फ्लिपकार्ट च्या हबमध्ये मोठया प्रमाणात वस्तुंची आवक-जावक असते. त्याच काळात हबमध्ये काम करणा-या कामगारां पैकी काही कामगांरानी वाढलेल्या कामाचा लोढचा फायदा घेत सादर प्रकार केला असण्याचे निष्पन्न झाले. तपासाच्या सुरवातीला डिलीव्हरी बॉय म्हणुन काम करणारा आशिष भोसले, वय २२ वर्षे, रा. रमाबाई नगर, पिंपरी लिंकरोड, पिंपरी, यास व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले असता. एकुण ०८ मोबाईल फोन त्यांच्या जवळ मिळाले. सदर आरोपीची पोलीस कस्टडी प्राप्त करून तपास केला असता, आरोपी पियुष मोहिते, वय २३ वर्षे, रा. नमो सृष्टी अपार्टमेंट, नेवाळे वस्ती, चिखली, याचे नाव निष्पन्न झाल्याने त्याला वाकड पोलिसांनी अटक केली. तपासात सर्व आरोपींकडून एकुण ५,९१,२४४/- रुपये किंमतीचे विविध कंपनीचे २४ मोबाईल फोन मिळाले असून ते पोलिसांनी जप्त केले आले आहे. दाखल गुन्ह्याचा उर्वरित मोबाईल बाबत तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परि – २ पिंपरी चिंचवड डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग डॉ. विशाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली, वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफौ. बिभीषण कन्हेरकर, सपोफौ.बाबाजान इनामदार, सपोफौ.राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा . प्रमोद कदम, पोहवा. वंदु गिरे, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि.सौदागर लामतुरे, पोशि. कौंतेय खराडे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि. सागर पंडीत (परि- ( ०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.
फ्लिपकार्टला लाखोंचा गंडा घालणाऱ्या दोन डिलीव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी केली अटक












