चिखली मोशी येथील उद्यानासाठी आरक्षित एक हेक्टर जागा महानगरपालिकेने हॉर्स रायडिंग साठी दिली असता नागरिकांनी त्याबद्दल निषेध व्यक्त केला होता त्यानंतर सदर उपक्रमाने नागरिकांचा फायदा होईल व नागरिकांना उद्यान जवळ असलेल्या दुसऱ्या आरक्षित जागेवर बनवून देऊ असे वक्तव्य महानगरपालिका चे आयुक्त शेखर सिंह यांनी केले होते. मात्र पुन्हा आता शिवसेनेच्या उपशहर संघटिका रूपाली आल्हाट यांनी यासंदर्भात बेमुदत उपोषण करण्यात असल्याचे सांगितले आहे.
या संदर्भात संपूर्ण माहिती अशी की मोशी चिखली येथील रिव्हर रेसिडेन्सी जवळील आरक्षण क्रमांक pg 1/137 ही जवळपास एक हेक्टर जागा 2005 साली प्ले ग्राउंड साठी आरक्षित केली गेली होती. त्यानंतर त्या सभोवताली झपाट्याने गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिली आणि याच आरक्षित जागेचा आधार घेत गृहनिर्माण प्रकल्पांची जास्तीच्या किमतीत विक्री कार्यांत आली.
काही काळात का होईना महानरपालिका या प्ले ग्राउंडला तयार करून नागरिकांसाठी खुले करून त्या ठिकाणी नागरिकांना हक्काचे मैदान उपलब्ध करून देणार. मुले वृद्ध माणसे आरामात बसू खेळू शकणार, असे अनेक अपेक्षा नागरिकांच्या मनात होत्या, मात्र ते नागरिकांचे स्वप्नच राहिले असून महापालिका हा आरक्षित भूखंड हॉर्स रायडींगसाठी खाजगी व्यक्तीच्या घशात घालत असून त्याविरोधात रूपाली आल्हाट बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी पिंपरीत पत्रकारांची संवाद साधताना बोलले.
त्या म्हणाल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सर्व प्रभागात काही जागांवर आरक्षण टाकून काही भूखंड वेगवेगळ्या कामांसाठी आरक्षित केले आहे या आराखड्यात शाळा प्रेगाव गार्डन हॉस्पिटल अशा अनेक गोष्टींच्या समावेश आहे मोशीत आरक्षित केलेली जागा शेतकऱ्यांकडून मूल शासकीय किमतीत घेण्यात आल्या आणि त्या बळीराजांनी आपल्या जमिनी भविष्याचा आणि विकासाच्या विचार करता मन मोठे करून देऊन टाकल्या. परंतु महापालिकेने नागरिकांच्या हक्काचे खेळाचे मैदान हर्षवर्धन देशमुख यांना 50 हजार रुपये अनामत रक्कम स्वीकारून करार पद्धतीने हॉर्स रायडिंग साठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. यासाठी महानगरपालिका आयुक्त यांनी ठराव करून हे मैदान चालवण्यासाठी दिले हे मैदान फुकट स्वरूपात महानगरपालिकेने दिले असून या ग्राउंडवर होणाऱ्या हाच वेडिंग साठी प्रत्येक मुलाला आठ ते दहा हजार रुपये मोजावे लागणार आहे म्हणजेच नागरिकाच्या हक्काचे मैदान जे फुकट वापरता येणार होते त्याला आता पैसे द्यावे लागणार आणि ज्यांना पैसे द्यायला पाहिजे ते एवढी मोठी करोडो रुपये किमतीची जागा फुकट वापरणार. महानगरपालिका हर्षवर्धन देशमुख यांच्यावर एवढी उदार कशी काय होऊ शकते?असा सवाल ही आल्हाट यांनी पालिकेला विचारला आहे.
एकीकडे महानगपालिकेच्या परिसरात अतिक्रमणाचा एक फूट असेल तरी पोलीस यंत्रणा लावून ते पाडले जाते आणि एकीकडे एवढी मोठी जागा फुकट वापरासाठी देण्यात येते; हाच का नागरिकांना न्याय आणि विकासाची ध्येय धोरण. स्थानिक नागरिकांचा या गोष्टीला मोठ्या प्रमाणात विरोध असताना देखील हा विरोध झुगारून महानारपालिका आयुक्त यांनी ही आरक्षित जागा फुकट स्वरूपात चालवण्यास देऊन स्वतः उदघाट्न केले आणि नागरिकांच्या भावना दुखावल्या.
रुपाली आल्हाट यांनी महानगरपालिका आयुक्त यांना वारंवार पत्रव्यवहार केले. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही, त्या एकाही पत्राला उत्तर मिळाले नाही. याच गोष्टीचा पाठपुरावा करून नागरिकांना त्यांच्या हक्काचे खेळाचे मैदान मिळवून देण्यासाठी रुपाली आल्हाट यांनी हा लढा हाती घेऊन बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. जो पर्यंत नागरिकांना त्यांच्या हक्काचे मैदान मिळत नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण चालू राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.












