शासकीय अधिकाऱ्याने लाच (Corruption) मागितल्याची घटना कोल्हापुरात सोमवारी घडला
तक्रारदार सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. लाभातील रजा रोखीकरणासाठी सहा प्रस्ताव उपसंचालक कार्यालयात देण्यात आला होता. आरोपी सहाय्यक अधीक्षक वरुटे यांनी तक्रारदाराकडे “रजा रोखीकरणाच्या प्रस्तावावर त्रुटी काढत नाही आणि प्रस्तावात अतिरिक्त मन रजा मंजूर करतो” असे म्हणत तीस हजार रुपयांची लाच मागितली. सोमवारी दिनांक 29 मे रोजी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रारदारांनी अर्ज केला. दिलेल्या तक्रारीप्रमाणे 29 मे रोजी वरूटे यांनी रकमेची तडजोड करत तक्रारदारांना पंचवीस हजार रुपये द्यायला सांगितले .
मंगळवारी दिनांक 30 मे रोजी आरोपी वरुटे यांनी लाच विलास शिंदे यांच्याकडे देण्यास सांगितले. आरोपी विलास शिंदे तक्रारदाराकडे आले असता 25 हजार रुपये रक्कम आपल्या सोबत असलेल्या आरोपी शिवम शिंदे यांच्याकडे द्यायला सांगितली. त्याच ठिकाणी आरोपी विलास शिंदे आणि आरोपी शिवम शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले.
आरोपी परशुराम वरोटे वय ४०, सहाय्यक अधीक्षक, आरोपी विलास शिंदे वय ५७, चालक ग्रामीण रुग्णालय पारगाव, शिवम शिंदे रा पारगाव यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची कारवाई श्री अमोल तांबे पोलीस उपायुक्त अँटी करप्शन ब्युरो पुणे आणि श्री विजय चौधरी पोलीस उपयुक्त अँटी करप्शन ब्युरो पुणे (ACB Pune) यांच्या मार्गदर्शनानुसार श्री सरदार नाळे पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर (ACB Kolhapur) आणि त्यांच्या टीमने केली
रजा रोखीकरणाच्या अर्जाला मंजुरी मिळण्या साठी मागितली तीस हजार रुपयांची लाच (Corruption)












