पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र औद्योगिक तसेच आय टी क्षेत्रांचा समावेश असल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्याचप्रमाणे वाहतुकीच्या अपराधामध्ये व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त बापू बांगर (वाहतूक शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने उगारला आहे.
१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ३२ हजार ७७५ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्यावर २ कोटी ७२ लाख १९ हजार ७०० रुपयांचा दंड आकारला आहे.
शहरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीशी निगडीत होणाऱ्या अपराधांची संख्या देखील वाढू लागली आहे. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी तसेच अपघात रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.नोव्हेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत दोन कोटी ७२ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा दंड आकारला आहे. तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ६०७ वाहन चालकांवर थेट खटले दाखल केले आहेत. तसेच जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी केलेल्या मार्गावर प्रवेश करणाऱ्या ६३७२ जड अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. महिन्याभरात एकूण ३२ हजार ७७५ वाहन चालकांवर ही कारवाई केली आहे.
वाहतूक शाखेने केलेल्या कारवाया –
मोबाईल टॉल्किंग – ९३९
सिग्नल जम्पिंग – १७२८
ट्रिपल सीट – ३५५९
नो हेल्मेट – २८८०
विदाऊट सीटबेल्ट – २२२०
काळी काच – १३९०
सायलेन्सर मॉडिफाय – ८८४
वाहतुकीस अडथळा – ८८९६७
बीआर टी मधून वाहन चालवणे – ३२२९












