क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यकारणी सभा पुणे जिल्हा यांच्यावतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री नागेश्वर विद्यालय मोशी, पुणे येथील गुणवंत, विद्यार्थी प्रिय श्री सदाकाळ पी.बी, श्री निकम बी.जी यांना देण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यकारणी समिती पुणे जिल्हा यांच्या विद्यमानाने प्रत्येक वर्षी हा पुरस्कार समाजातील आदर्श शिक्षकांना देण्यात येतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण माजी संचालक बार्टी, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. एन डी धिवार फुले शाहू आंबेडकर वि. स पुणे व अशोकराव नाळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पाडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारणी समिती पुणे जिल्हा समितीचे अध्यक्ष आणि भीमराव दीवार, एम.जी शेलार, सचिव रा.वी शिशुपाल, सहसचिव विजय रोकडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला माजी आमदार जयदेव गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे येथे पार पडला.












