देहूरोड वाहतूक विभाग हद्दीतील मुकाई चौक, किवळे याठिकाणी वाहतूक जास्त असल्याने सदर ठिकाणावरून रावेत कडे जास्त प्रमाणात मोठी जड अवजड वाहने पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करत असल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होते व अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुकाई चौकातून रावेत हँगिंग ब्रिज कडे अवजड वाहन बंदी करणे आवश्यक असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरिता, महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या नोटिफिकेशन नुसार, मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१), ११६(४) आणि ११७ अन्वये बापू बांगर पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा यांनी तात्पुरते स्वरूपात आदेश निर्गमित केला आहे.
देहूरोड वाहतूक विभागांतर्गत सदर आदेश खालील प्रमाणे असतील
मुकाई चौकातून रावेत कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना सकाळी ८ ते सकाळी ११ वाजे दरम्यान व सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजे दरम्यान प्रवेश बंदी करण्यात आली आहे, पर्यायी मार्ग स्वरूपी सदर मार्गावरील जड अवजडवाने हे मुकाई चौकातून मावळा पुतळा जवळून डावीकडे वळून बेंगलोर हायवे कडे जातील, सदर सूचनेची अंमलबजावणी दिन २३/११/२०२३ पासून प्रयोगिक तत्त्वावर करण्यात आली असून नागरिकांनी याबाबत काही सूचना किंवा हरकती असल्यास त्या पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड यांचे कार्यालय दि. २३/११/२०२३ ते दि. ७/१२/२०२३ पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात. नागरिकांचे सूचना व हरकती यांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येईल याबाबत बापू बांगर यांनी सूचना केल्या आहेत.












