पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०७ : भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवरील झालेल्या दंगली मधे जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घ्यावेत.
2018 मधील भीमा कोरेगाव प्रकरणात घडून आलेल्या दंगली मध्ये अनेक आंबेडकर अनुयायांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेच गुन्हे मागे घेण्यासाठी दिनांक 5 डिसेंबर पासून सर्जेराव वाघमारे , समीर अण्णा जाधव , प्रदीप थोरात व पंकज साबळे या भीम अनुयायांनी आमरण उपोषण पुकारले आहे.
त्याच बरोबर त्यांची मागणी अशी देखील आहे की, भीमा कोरेगाव मधील विजय स्तंभाच्या विकास कामा साठी जो निधी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व धनंजय मुंडे यांच्या तर्फे 2019 ला 100 कोटी मंजूर केले होते. ते आजतागायत पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झाले नसून रक्कम रुपये 100 कोटी 200 कोटी अशी त्वरित जिल्हा अधिकाऱ्याकडे जमा करावी. अश्या स्पष्ट मागण्या आंबेडकरी अनुयायांनी उपोषणा मार्फत मांडल्या आहेत .












