पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : मुंबई येथील ठाणे शहरात २४ घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या अट्टल आरोपीस पिंपरी चिंचवड शहरातील केलेल्या पहिल्याच घरफोडीत, साथीदारा सह पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून १ लाख २२ हजार रु किमतीचे दागिने जप्त केले आहे.
अब्दुल उर्फ चिरा इद्र शेख वय ४७ व धर्मेश राम आचार्य दिवाकर वय २८ दोघे राहणार अलकापुरी, नालासोपारा जी. पालघर असे अटक केलेले आरोपींची नावे असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारअमेय विजय बिरजे वय ३७ रा. फ्लॅट नं. सी ५०४, प्रिस्टीन प्रोलाइफ, फेज नं. १ शंकर कलाटे नगर, वाकड यांनी वाकड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती कि, दि. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वा ते दि. १७ नोव्हेंबर रोजी २ वा दरम्यान त्यांचे पाचव्या माळावर बंद घराची गॅलरी मधून अख्याने प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरी करून दिले आहेत.
त्यांच्या या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी अज्ञातांन विरोधात भा. द. वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सदरचा गुन्हा हा एक मोठ्या सोसायटीमध्ये आणि उंच टावर वर पाचव्या मजल्यावर गॅलरीचे साह्याने चढून केला असल्याने वेगळा पद्धतीचा होता. वरिष्ठांच्या आदेशान्वये व वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांना आरोपी एका रिक्षातून जात असल्याचे निष्पन्न झाले व सदर आरोपी पालघर जिल्ह्यातील असल्याचे माहिती प्राप्त करून, या दोघे आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा घरफोडीचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले.
यांपैकी अब्दुल उर्फ चिरा शेख हा घरफोडीचा सराईत गुन्हेगार असून याच्यावर मुंबई-पालघर-ठाणे येथील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण २४ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याबाबत ची माहिती प्राप्त झाली. या आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या मला पैकी एक लाख बावीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
आपण राहण्यास पालघर मध्ये असल्याने आपण पिंपरी चिंचवड व पुणे परिसरात घरफोडी केल्यास आपल्याला कोणी ओळखणार नाही, आपल्यापर्यंत पोलीस पोहोचणार नाही, अशा समजुतीने आरोपीने सदरचा गुन्हा केला होता परंतु वाकड तपास पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत या सराईत आरोपींचे मुसक्या आवळल्या आहेत.
अब्दुल उर्फ चिरा इद्रस शेख याच्यावर मुंबईमध्ये दाखल गुन्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे.
१) तुळीज, जि.पालघर – ४९०/२०१७ भादविक४५४,३८०
२) तुळीज, जि.पालघर – ७३০/२०१७ भादविक ४५४,३८०
३) तुळीज, जि.पालघर – २००/२०१८ भादविक ४५४,४५७,३८०
४) तुळीज, जि.पालघर – २२६/२०१८ भादविक ४५४,४५७,३८०
५) तुळीज, जि.पालघर – ३८०/२०२१ भादविक ४५४, ४५७,३८०
६) तुळीज, जि.पालघर – ४३६/२०१७ भादविक ४५४,३८०
७) तुळीज, जि.पालघर – ५११/२०१७ भादविक ४५७,३८०
८) तुळीज, जि.पालघर – ७८५/२०१७ भादविक ४५४,४५७,३८०
९) तुळीज, जि.पालघर – ५९/२०१८ भादविक ४५४,४५७,३८०
१०) तुळीज, जि.पालघर – १००/२०१८ भादविक ४५७,३८०
११) तुळीज, जि.पालघर – २२२/२०१८ भार्दविक ४५४,४५७,३८०
१२) तुळीज, जि.पालघर – २२३/२०१८ भादविक ४५४,४५७,३८०
१३) तुळीज, जि.पालघर – २६० /२०१८ भादविक ४५४,४५७,३८०
१४) तुळीज, जि.पालघर – २८५/२०१८ भादविक ४५४,४५७,३८०
१५) तुळीज, जि.पालघर – ३४३/२०१८ भादविक ४५४,४५७,३८०
१६) तुळीज, जि.पालघर – ६७०/२०१५ भादविक ४५४,४५७,३८०
१७) गावदेवी जि.मुंबई – २१८/२०२१ भादविक ४५४,४५७,२८०
१८) नालासोपारा जि.पालघर – ५६५/२०१४ भादविक ३२४,५०४,५०६
१९) सांताक्रुझ मुंबई – ४७४/२०१३ भादविक ४५४,४५७,३८०
२०) खार मुंबई – ७१०/२०१४ भादविक ४५४,४५७,३८०
२१) साताक्रुझ मुंबई – १४९/२००६ भादविक ४५४,४५७,३८०
२२) साताक्रुझ मुंबई – ६५४/२०१४ भादविक ४५७,३८०,५११
२३) साताक्रुझ मुंबई – ५९२/२०१४ भादविक ४५४,४५७,३८०
२४) साताक्रुझ मुंबई – ६७७/२०१४ भादविक ४५४,४५७,३८०












