पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १६ : जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून एका इसमास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कात्रज येथील आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले असल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
संकेत विठ्ठल रेणुसे ( वय १९, रा. ससेवाडी, शिंदेवाडी,भोर,पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ रोजी फिर्यादी हे त्यांच्या भाऊ मयूर जाधव याच्यासह ऑर्डरचे फटाके देण्यासाठी जैन मंदिर, कात्रज येथे गेले होते.त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांचा भाऊ निखिल जाधव याच्याशी २०१९ मध्ये झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी दोन अल्पवयीन मुले व दोन अनोळखी मुलांशी संगनमत केले.
आरोपीने त्यांच्या मदतीने फिर्यादी यांच्या डोक्यात,पाठीत,हातावर वार करून जखमी करत त्यांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांचा भाऊ मयूर जाधव याला देखील डोक्यात, हातावर, पाठीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे.
आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना ते कात्रज तलाव येथे थांबले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता आरोपी आणि त्यास सहकार्य करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी विरोधात भादवी कलम ३०७,३२३,१४७,१४८,४१९,५०४,५०६ आर्म ॲक्ट ४,२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ही कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्री. विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहा. पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक, धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, विक्रम सावंत, अभिजीत जाधव, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.












