महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये अमृत गटात तसेच हरित आच्छादन आणि जैवविविधता प्रकारात उच्चतम कामगिरीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यात अव्वल ठरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महानगरपालिकेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या समारंभाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. मुंबई येथे पार पडलेल्या समारंभामध्ये महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे. अमृत गटातील अव्वल क्रमांकासाठी ८ कोटी रुपये रोख व प्रमाणपत्र आणि जैवविविधता प्रकारात उच्चतम कामगिरीसाठी २ कोटी रुपये रोख व प्रमाणपत्र असा पुरस्कार पिंपरी चिंचवड महापालिकेने पथकावला आहे(development campaign).
या पुरस्कार सोहळ्याला अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, उप आयुक्त रविकिरण घोडके, स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या समन्वयक सोनम देशमुख, पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता हरविंदरसिंग बन्सल, सेवानिवृत्त उद्यान अधिक्षक गोरख गोसावी आदी उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत उच्चतम कामगिरी बद्दल पुणे महसूल विभाग राज्यात पहिल्या क्रमांकाचा विभाग ठरला आहे. त्याशिवाय विविध गटातून एकूण ८ पुरस्कार पुणे जिल्ह्याला प्राप्त झाले. यामध्ये अमृत गट (राज्यस्तर) अंतर्गत १० लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात राज्यस्तरावर पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला पहिला क्रमांकाचा आणि पुणे महानगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. याच गटात भूमी थिमॅटिक मधील उच्चतम कामगिरीचा पुरस्कार पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला जाहीर झाला.
नगर परिषद व नगर पंचायत गट अंतर्गत ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये राज्यस्तरावर लोणावळा नगर परिषदेला दुसऱ्या क्रमांकाचा आणि बारामती नगर परिषदेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. या गटात भूमी थिमॅटिक मधील उच्चतम कामगिरीचा पुरस्कार लोणावळा नगर परिषदेला जाहीर झाला. याच गटात विभागस्तर पुरस्कार अंतर्गत पुणे विभागात तळेगाव दाभाडे नगर परिषदेला पुरस्कार जाहीर झाला. १५ ते १५ हजार लोकसंख्या गटात माळेगाव बु. (ता. बारामती) या नगर पंचायतीला राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला.
या अभियानात पुणे महसूली विभाग राज्यस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारा पहिला क्रमांकाचा विभाग ठरला आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यासाठीचा राज्यस्तरावरील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पुणे जिल्हाधिकारी यांना जाहीर झाला आहे
माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत पुणे जिल्हा सर्वोत्तम(development campaign)












