लोणी काळभोर परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक क्र 1 चे कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार योगेश मोहिते व विशाल शिंदे यांना अमली पदार्थ विक्रीसाठी व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचला. प्रकागधाम ट्रस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल बस स्टॉप येथे एक चार चाकी गाडी जवळ संशयित इसम निदर्शनास आला. संशयित इसम जितेंद्र दुवा वय ४०, रा उरुळी कांचन, मूळ वेस्ट दिल्ली याची पथकाने तपासणी केली. या तपासणी दरम्यान त्याच्या चार चाकी वाहनांमध्ये 36 लाख 43 हजार दोनशे रुपयात किमतीचा ऐवज आढळला. यामध्ये 20 ग्रॅम 670 मिलिग्रॅम पांढरे क्रिस्टल स्वरूपातील माफेड्रोन(Drug) चार लाख 13 हजार 400 रुपये किमतीचे, 80 ग्रॅम ३०० मिलिग्रॅम क्रिस्टल स्वरूपातील 16 लाख ६ हजार 800 रुपये किमतीचे, 610 मिलिग्रॅम बंटा अमली पदार्थ ०६ लाख १० हजार रुपये किमतीचे तर ४ हजार रुपये रोख रक्कम,इलेक्ट्रॉनिक वजन काटा रुपये 2000 किमतीचा, तीन मोबाईल फोन १० हजार रुपये किमतीचे चार चाकी गाडी एम एच 04 जी इ 8120 १० लाख रुपय किमतीची असा एकूण एवज व बेकायदेशीर रित्या अमली पदार्थ विक्री करताना आढळल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या परप्रांतीय व्यक्तीस केले जेरबंद (Drugs)












