सध्या शहरात वाहनचोरीच्या घटना सतत कानी ऐकायला मिळतात.वाहनचोरीच्या घटनेत वाढ होताना दिसून येते.अशीच एक घटना वानवडी पोलिस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे.
दि.०३/०६/२०२३ रोजी फिर्यादी नामे अतिक सय्यद ( वय २५ वर्षे, रा. हडपसर, पुणे ) यांनी त्यांचे मालकीचा टाटा कंपनीचा टेम्पो हा दि. ३१/०५/२०२३ रोजी रात्री ०९/३० वा. ते दि.०१/०६/२०२३ रोजी सकाळी ०९/०० वाजायच्या दरम्यान त्यांच्या ( भारत ट्रेडर्स नावाच्या स्क्रॅप मटेरिअलच्या दुकानासमोर, रोडच्या कडेला, अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ, रामटेकडी, हडपसर, पुणे ) येथे चावी गाडीलाच विसरुन पार्क केला होता.तो टेम्पो कोणीतरी अनोळखी / अज्ञात चोरट्याने त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने रू.२.५०,०००/- रक्कमेचा फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरी करून नेलेला आहे. व सदर बाबत अनोळखी चोरट्याबाबत वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २५२ / २०२३. भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे..
दाखल गुन्हयाचे अनुषंगाने अज्ञात चोरट्याबाबत माहीती काढत असताना पो. हवा नाईक व पो. अंम गायकवाड यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली होती.मिळालेल्या बातमी वरुन तपास पथक प्रमारी अधिकारी व तपास पथकातील पोलीस अंमलदार असे सापळा रचुन बातमी प्रमाणे टेम्पो व टेम्पो चोरी करणाऱ्या इसमास ताब्यात घेतले. त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राहुल छगन फडतरे ( वय २४ वर्ष, रा. वडकी, कानिफनाथ पायथा, ता. हवेली, जि. पुणे ) असे सांगितल्याने वरील दाखल गुन्हात अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे सांगितले आहे.त्याच्यावर चंदनगर पोलिस स्टेशन, कोंढवा पोलिस स्टेशन,सिंहगड पोलिस स्टेशन,हडपसर पोलिस स्टेशन,भोसरी पोलिस स्टेशन,डेक्कन पोलिस स्टेशन इत्यादी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.
आरोपीवर भादवी कलम ३७९ ,३७९ ( ६ ), ३७९ ( १० ), ३७९(१२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून.आरोपीला अटक करण्यात आली आहे(Imprisoned).
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक. वानवडी पोलिस स्टेशन हे करत आहेत.
सदरची कामगीरी मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त परि.-५, पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, संतोष नाईक, हरिदास कदम, विनोद भंडलकर, हरिदास कदम, अतुल गायकवाड, सौदागर माने राहुल गोसावी, संदिप साळवे, निलकंत राठोड, विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले अमोल गायकवाड व सोनम भगत यांनी केली आहे.












