आजकाल प्रवासात चोरी होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.अशीच एक परराज्यातील प्रवाशास लुटणा-या आरोपीतांना पोलिसांनी जेरबंद(imprisoned accused) केल्याची घटना भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे.
फिर्यादी हे त्यांचे कंपनीचे ट्रेनिंग करीता दि.०१ रोजी कात्रज, पुणे येथे आले होते.पांढरे रंगाचे मोपेडवरुन तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना पत्ता सांगण्याचे बहाण्याने त्यांना रस्त्यात अडवले.त्यांचे खिशातील ४५००/- रुपये जबरदस्तीने काढुन घेतले. त्यानंतर आरोपीतांनी फिर्यादी यांचा मोबाईल फोन काढुन घेत असताना फिर्यादी यांनी विरोध केला.त्यांनी विरोध केल्याने त्यांचे हातातील लोखडी कोयत्याने फिर्यादी यांचे डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले होते.
सदरबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३४६ / २०२३ भादंवि कलम ३९४,३९२, ३४१, ३४, आर्म अॅक्ट ४, २५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांचे गोपनीय बातमीदारांचे मार्फेतीने बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा आरोपी १ राजु नागनाथ कांबळे ऊर्फे काळया वय २० वर्षे, रा. गल्ली नंबर ७७, तळजाई वसाहत, पदमावती, पुणे २ अथर्व रविंद्र आडसुळ, वय २० वर्षे, रा. गल्ली नंबर ७७, तळजाई वसाहत, पदमावती, पुणे ( अटक) व विधीसंघर्षीत बालक ( ताब्यात) यांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली.
त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी नमुद आरोपी व विधीसंघर्षीत बालकाचा शोध घेवुन आरोपीतांना अटक करून विधीसघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्हयातील चोरी केलेली रक्कम व गुन्हयात वापरलेला लोखडी कोयता, दुचाकी गाडी जप्त केली आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे, श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक सहा पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांचे पथकाने केली आहे.












