राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद,बंधुता प्रतिष्ठान,काषाय प्रकाशन पुणे,रयत शिक्षण संस्थेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध पुणे,भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय भोसरी आणि भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघोली या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त बंधुता दिन पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यात पहिले सत्र,दुसरे सत्र व पुरस्कार वितरण समारोप समारंभ अशी कार्यक्रमाची रूपरेषा ठेवली होती.
कार्यक्रमाची सुरुवात ही बंधुतेची प्रकाशवाटा या कवितेने झाली.त्यानंतर ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या शुभहस्ते बंधुता ज्योत प्रज्वलन हे करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार हा जीवराज घोले यांना प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार फक्त माझा नसून लोकांच्या सामाजिक प्रश्नांसाठी वृत्तपत्रात लिखाण (literature) करणाऱ्या तमाम पत्रकारांचा आहे.हा पुरस्कार मी त्यांच्या वतीने स्विकारत आहे.तसेच काही कवींना बंधुता काव्य प्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून पहिल्या सत्राच्या अध्यक्षा मा.संगीता झिंझुरके या होत्या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष पदी मा.हरिश्चंद्र गडसिंग हे होते.कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ.बंडोपंत कांबळे यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात बंधुता प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार,बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार, बंधुता प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार या पुरस्कारांनी काही कवींचा सन्मान करण्यात आला.या सत्रात महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी झाले होते.याच महाराष्ट्रातल्या नामवंत कवींनी त्यांच्या वेगवेगळ्या कविता,गजल आणि चारोळी या सादर केल्या.तसेच रयत शिक्षण संस्थेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले वाणिज्य विभागप्रमुख डॉ.बंडोपंत कांबळे यांची राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद याच्या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.संगीता झिंझुरके या होत्या तर प्रा. डॉ.संजय गायकवाड यांनी स्वागताध्यक्ष पद भूषविले.
कार्यक्रमात बंधुताचार्य प्रकाश रोकडे,संगीता झींझुरके,चंद्रकांत वानखेडे,सुरेश बापू साळुंके, डॉ.अरुण आंधळे,डॉ.प्रदीप कदम,डॉ.श्रीपाल सबनीस,कृष्णकुमार गोयल,डॉ.विजय ताम्हाणे,हरिश्चंद्र गडसिंग,अशोक पगारिया,शंकर आथरे,डॉ.बंडोपंत कांबळे,डॉ.सहदेव चव्हाण, प्रा.सदाशिव कांबळे,संजय गायकवाड,नितीन वायाळ, मधुश्री ओव्हाळ, गुलाबराजा फुलमाळी,प्रकाश जवळकर,आणि महाराष्ट्रातील नामवंत कवी हे उपस्थित होते.रमेश पाचंगे यांच्या चौघडा वादनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.











