आपण आपल्या प्रियजनांसाठी ते आजारी असताना त्यांच्या उपचारासाठी काहीही करायला तयार असतो.उपचार म्हणले की पैशांची गरज ही आलीच.त्यासाठी आपण ओळखीच्या व्यक्तींकडून पैसे उसने घेतो.पण हे पैसे वेळेवर परत करू शकलो नाही तर समोरची व्यक्ती ही पैशांची किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीची मागणी करते(misbehave).अशीच एक घटना वाकड पोलिस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे.
महिला फिर्यादीने माणिक मारुती विधाटे ( रा.मु.पो.साळुंब्रे ता. मावळ जि.पुणे ) या त्यांच्या चुलत दिरा विरुद्ध वाकड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी यांना त्यांच्या पतीच्या उपचारासाठी त्यांच्या चुलत दिर असणाऱ्या आरोपीने सन २०२० मध्ये एक लाख रुपयांची मदत केली होती.ते पैसे फिर्यादी या आरोपीस परत करू शकल्या नाहीत.त्याचा गैरफायदा घेत आरोपीने चार महिन्यांपासून ते दि.०४/०६/२०२३ पर्यंत खरेदी करण्याच्या बहाण्याने ताथवडे,पुणे येथे लॉज वर घेऊन गेले आणि वारंवार त्यांच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.
आरोपीवर भादवी कलम ३७६ ( २ ) एन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दाभाडे हे करत आहेत.












