गेल्या काही दिवसांपासून रस्त्याने थांबलेल्या व पादचारी मार्ग वापरणाऱ्या नागरिकांचे मोबाइलला फोन चोरी होत आहेत. जवळच्या काळात या घटनांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. मात्र आता या चोरांच्या मुस्क्या आवळत कारवाई सुरु केली आहे.
पोलीस दलातील युनिट पाच (Pune Crime) पथकातील कोंढवा मधील कर्मचारी पेट्रोलिंग करत असता, यावेळी एक इसम हॉटेल ज्योती चौक जवळ संशयित रित्या वावरत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्ववभूमीवर पोलिसांनी इसमाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चोवकाशी वेळी इसमाने आपली ओळख विनायक मनोज बनकर (वय २१) राहणार अप्पर इंदिरानगर असल्याचे सांगितले. सदरील इसमाची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे ९० हजार रुपये किंमतीचे सहा फोन आणि गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ४५ हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
आरोपीला दारू पिण्याचे व्यसन असल्याने या व्यसनासाठी आरोपी व त्याचा विधी संघर्षित साथीदार हे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी विरोधात भारती पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस स्टेशन व हडपसर पोलीस स्टेशनमध्ये मागील पाच गुणांची नोंद आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा.पोलीस सह युक्त, श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री.सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नरीक्षक, उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक, चैताली गपाट, पोलीस अमलदार, रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, शशिकांत नाळे,पृथ्वीराज पांडुळे, विलास खंदारे, राहुल ढमढेरे यांनी केली आहे.
सराईत मोबाईल हिसकावून घेऊन जाणारा चोर पोलिसांकडून अटकेत (Pune Crime)












