पुणे : पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ऑल आउट ऑपरेशनवर भर दिला असून, या महिन्यात आतापर्यंत तीन वेळा कोम्बिंग ऑपरेशन राबण्यात आले आहे. या तीन कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ५,४१९ गुन्हेगारांची तपासणी केली असून १,७२७ गुन्हेगारांना अटक केली आहे. आयुक्त व सह आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून पोलिसांना मार्गदर्शन करत होते.
कोथरूड येथून दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या डोक्यावर प्रत्येकी 5 लाखांचे बक्षीस एनआयएने जाहीर केले आहे. ते दीड वर्षापासून फरार होते. प्रदीप चव्हाण, अमोल शरद नाझन आणि कोथरूड पोलीस ठाण्यातील मंगेश शेळके हे पोलीस शिपाई हे त्यांच्या अटकेतील खरे नायक होते.
मंगळवारी (दि १८) रोजी शास्त्रीनगर बीट मार्शलचे पोलीस अंमलदार, प्रदिप चव्हाण व अमोल नजन हे शास्त्रीनगर पोलीस चौकी हद्दीत रात्रगस्त घालत होते. रात्री अडीच वाजतेच्या सुमारास त्यांनी तीन संशईत दुचाकी चोरांना ताब्यात घेतले. सदर आरोपींची घरझडती घेण्यात आली. घरझडती मध्ये एक जिवंत काडतुस, चार मोबाईल, एक लॅपटॉप व इतर कागदपत्रे पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत. अधिक तपास केल्यास आरोपी हे राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एनआयए) फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपी आयएसआयएसच्या सुफा संघटनेचे सदस्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मार्च 2022 मध्ये पोलिसांनी राजस्थानमधील चित्तोडगडमध्ये तीन आरोपींना पकडले होते आणि त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते.
पुढील तपासासाठी हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले आणि तपासादरम्यान युनूस साकी आणि इम्रान खान यांची नावे समोर आली. हे दोघेही याच प्रकरणात वॉन्टेड आरोपी असून त्यांच्या डोक्यावर प्रत्येकी 35 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. काही महिन्यांपासून ते पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते.
तर कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी चव्हाण व नाजान यांनी दोन्ही आरोपींना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे. मात्र, ते पुण्यात का आले होते, याचा शोध घेऊन तिसऱ्या फरार आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढावा लागेल.
त्यांच्याविरूध्द कोथरूड पो स्टे येथे गुरनं.१७५/ २०२३,भा.दं.वि.सं.कलम ४६८, ३७९, ५११, ३४, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ४ (२५), महाराष्ट्र पोलिस अॅक्ट क. ३७ (१) ३७ (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ०३, पुणे, श्री. सुहेल शर्मा यांनी यशस्वी कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथे बोलावुन त्यांना पुष्पगुच्छ देवुन, त्यांचा सन्मान केला आहे. तसेच यापुढे देखील त्यांनी अशीच उत्तम कामगिरी करावी यासाठी मार्गदर्शन केले आहे.
अंमलदारांच्या कुशलतेमुळे मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना चोप












