पुणे शहर पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी पथक दि. १४ ऑक्टोबर रोजी कोथरुडमध्ये गस्त घालत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वनाज मेट्रो स्टेशनजवळ सापळा लावून, मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ एक व्यक्ती संशयितरित्या थांबला असल्याचा दिसल्याने त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याने विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगले असल्याचा पोलिसांना समजले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला पकडून त्याच्याकडून अडीच लाखांचे एल.एस.डी व एम.डी.एम.ए जप्त केले आहेत. तेजस सुरेश गोपाल (वय २२, रा. डहाणुकर कॉलनी, कोथरुड मुळ रा. कोकोडी मकरा, जि़ कालीकत, केरळ) असे या अंमली पदार्थ तस्कराचे नाव आहे. त्याच्याकडे ४८ हजार रुपयांचे एल एस डी व एम डी एम ए हा अंमली पदार्थ तसेच २ लाख रुपयांच्या एम डी एम ए ५० पिल्स गोळ्या आढळून आल्या. पोलिसांनी त्याचबरोबर २० हजाराचा मोबाईल व दीड लाख रुपयांची मोटारसायकल असा ४ लाख १८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे,
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव रवींद्र रोकडे, मयुर सूर्यवंशी, उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, नितीन जगदाळे, निलम पाटील दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.