अल्पवयीन मुलीला घरी बोलवून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. हा प्रकार लोहगाव परिसरात जून २०१९ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.२१) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शकील उर्फ गुड्डु मुश्ताक शेख (वय-२७ रा. लोहगाव) याच्यावर आयपीसी ३७६, ३७६ ३), ३७७, ५०६ सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात.
आरोपीने फिर्यादी यांच्या १३ वर्षाच्या मुलीला वेळोवेळी घरी बोलावून घेतले.
आरोपीने तिच्यासमोर विवस्त्र होत अश्लील कृत्य केले. तसेच अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अश्लील वर्तन केले. पीडित मुलीने याबाबत आईला सांगितले. आईने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार शकील शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मेढे करीत आहेत.