मावळ : मावळ लोकसभेत आज महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर रोड शो आणि प्रचारसभा होणार आहे. येथे वाघेरेंची लढत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंशी होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी संजोग वाघेरे यांनी विश्वास व्यक्त केला की, खोट्या आश्वासनांना, महागाईला जनता वैतागली असून ती आम्हालाच मते देणार.
दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संजोग वाघेरे यांचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे दुपारी पिंपरी चिंचवड येथे पोहोतील. त्यानंतर जाहीर सभेचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
रॅली आणि प्रचारसभेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, रोहित पवार आणि शेकापचे बाळाराम पाटील सहभागी होणार आहे.
अर्ज भरण्यापूर्वी संजोग वाघेरे म्हणाले, कोणतीही निवडणूक ही महत्त्वाची असते.
विरोधात असलेला उमेदवार तगडा असल्याने आम्ही देखील तशीच तयारी केली आहे.
ज्या पद्धीतने रॅलीला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यावरुन मतदारराजाचा कौल आम्हाला मिळणार असून आमचा विजय निश्चित आहे.