आरएमसी वाहनाने मावळ तालुक्यातील एका तलाठ्याच्या कारला धडक दिली. सुदैवाने या घटनेत तलाठी सुखरूप आहेत. ही घटना बुधवारी (दि. ३) देहूरोड जवळ पुणे मुंबई जुन्या महामार्गावर घडली. याबाबत माहिती अशी की, कान्हे गावचे तलाठी रवी मेहरुत हे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून कारणे जात होते देहूरोड येथील सेंट्रल चौकाच्या पुढे तळेगावच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारला पाठीमागून आरएमसी वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली. यामध्ये मेहरुत यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कार मधील सर्व एअर बॅग उघडल्याने ते बचावले.
या अपघातामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
असाच एक अपघात बुधवारी (दि. ३) रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत आकुर्डी रेल्वे स्टेशन व डि.वाय. पाटील कोलाज आकुर्डी या दरम्यान असलेल्या चॊकात घडला. या अपघात मध्ये कर चालक कार उजव्याबाजूला वाळवत असताना आरएमसी वाहनाने एका बाजूने पूर्ण कार घासून, आपल्याकडून अपघात झाला आहे याची जाणीव असून देखील तेथून तो निघून गेला. कारचालकाने त्याचा पाठलाग केला. त्या रोडवर गतिरोधक असल्या मुले आरएमसी वाहन चालकाला वेग कमी करावा लागला व कारचालकाने त्याला थांबवून पोलिसांना फोनवरून कळविले असता पोलिसांनी दोन्ही गाड्या व चालकांना रावेत पोलिस स्टेशनला नेले. कारचालक महिला होती, व तिच्या सोबत तिची आई व ५ वर्षाची मुलगी होती. सुदायवाने या अपघातात कोणत्याही प्रकारे जीवित हानी झाली नसून कारचा मोठा नुकसान झाला. आरएमसी वाहन मालक त्या ठिकाणी आलेल्या नंतर त्याने कारचा नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिल्यामुळे त्याचचं आपसात समजुत झाली व गुन्हा दाखल झाला नाही.
मात्र या दोन्ही अपघातात चूक पूर्णपाने आरएमसी वाहन चालकांचीच असल्याने हे अपघात घडले आहे. असे कितीएक अपघात घडून अनेक निष्पाप मातृमुखी पडत असतात मात्र अपघातंची नोंद खूप कमी होती, त्याचा कारण असा कि भौतेक आरएमसी गाड्या हे स्थानिक रहिवाशी (गाव वाले), नगरसेवक,आमदार, खासदार यांचे किंवा यांच्या भाऊकीतले असतात. अशे अपघात टाळण्यासाठी ट्राफिक, आर.टी.ओ. व संभंदीत प्रशासनाने उपाय योजना करणे बांधकारक आहे, तसेच ते लवकरात लवकर कारवायात अशी मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे.