महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित सिझन १३ चे महेश आयडॉल २०२४ – २५ चे मानकरी ठरले प्रथम ऋतुजा सोमाणी, द्वितीय अनुजा माहेश्वरी, तृतीय भूषण तोष्णीवाल या स्पर्धेत देशभरातून ७५ माहेश्वरी युवक -युवतींनीं सहभाग नोंदविला होता.
माहेश्वरी समाजातील प्रतिभावान तरुण व्यक्तिमत्त्वांना समाजासमोर आणून त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखत प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महेश आयडॉल २०२४-२५ सीझन १३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि देशभरातील ७५ युवक-युवतींनी यामध्ये सहभाग नोंदविला होता.
निकषांच्या छाननी नंतर त्यापैकी स्पर्धे साठी दहा जणांची निवड करण्यात आली आणि अंतिम फेरीत पाच जणांतून वरील तिघे सीजन १३ चे विजेते घोषित करण्यात आले. ही स्पर्धा दिनांक ९ फेब्रुवारी रोजी कोथरूड मधील एमआयटी संस्थेच्या सभागृहात मोठ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शरद शामसुंदरजी सोनी (अध्यक्ष अ. भा. मा. युवा संघटन), रूपल मोहता (भारतीय मॉडेल आणि मिसेस इंडिया युनिव्हर्स 2019 आणि दिवा मिसेस इंडिया 2018) व अखिलेश तिलोतीया (रणनीतिकार, भारत तज्ञ, सार्वजनिक धोरण तज्ञ, लेखक ) यांनी काम पाहिले. जागतिक तसेच देशपातळी वरील घडामोडीवर, ऐतिहासिक, वैज्ञानिक, धार्मिक, मनोरंजन, सामाजिक क्षेत्रातील विषयावरील स्पर्धकांना प्रश्न विचारण्यात आले..
ऋतुजा सोमाणी छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून संगीत विशारद ही पदवी प्राप्त आहेत, अनुजा माहेश्वरी नाशिक येथील रहिवासी असून वकिली व्यवसायिक व टेनिस प्लेयर आहेत तर भूषण तोष्णीवाल हे सीए असून मोटिवेशनल स्पीकर व सिंगर आहेत विशेष म्हणजे दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन असूनही त्यांनी या स्पर्धेत यश प्राप्त केले.
कार्यक्रम यशस्वीते करिता सोनल मंत्री, रश्मी तोष्णीवाल ,चेतन चांडक, सुधीर नागोरी, श्रुती मंत्री, महेश जाजू, निहारिका करवा, कमलकिशोर मंत्री, दिलीप मुंदडा , सुमित सारडा, अलोक झंवर, आशा करवा, नकुल सारडा , यश करवा, परितोष राठी यांनी विशेष योगदान दिले. स्पर्धेला श्रुती करनानी, डॉ. अशोक लढ्ढा, सीए. विमल करनानी , सीए. मनोज मालपाणी यांचे मार्गदर्श लाभले.
सूत्रसंचालन शुभम मंत्री व स्नेहल सारडा यांनी केले. स्पर्धकांना महेश आयडॉल हा पुरस्कार देऊन गौरवण्यातआले . एमआयटी कोथरूड येथील ऑडिटोरियम स्पर्धेला उपस्थित राहणाऱ्यानीं गच्च भरले होते.