पिंपरी चिंचवड : कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट येथून चोराने तब्बल वेगवेगळ्या प्रकारचे साडेपाच लाख रुपयांचे कॉपर वायर चोरून नेले आहे. ही चोरी ३० मार्च २०२३ ते २ मे २०२४ या कालावधीत ताथवडे येथे घडली आहे.
याप्रकरणी योगेश दत्तात्रय शिंदे (वय ५० रा.वडगाव,पुणे )यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून हिंजवडी पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काम करत असलेल्या रोशन माईल स्टोन नावाच्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट येथून ५ लाख ४९ हजार रुपयांचे वेगवेगळे प्रकारचे कॉपर वायर चोरून नेले आहे.यावरून हिंजवडी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.