तु कॉलेजमध्ये कोणत्या मुलीला काय बोलला असे म्हणत आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि.३०) दुपारी दोनच्या सुमारास कडदे मावळ येथे घडला आहे.
याबाबत साहील बाळासाहेब देशमुख (वय-१९ रा. कडदे मावळ) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विशाल काकडे (रा. माण), नागेश (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यासह इतर चार ते पाच जणांवर भा.दं.वी. कलम ३२४, ३२३, १४३, १४६, १४९ सह महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी साहिल देशमुख याला तू कॉलेजमध्ये कोणत्या मुलीस काय बोलला, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विशाल काकडे याने साहिल याला प्लास्टिकच्या पाईपने पाठीत मारहाण करून जखमी केली. लाथा बुक्क्यांनी मारहाण करत याला लय माज आला आहे. याला मारा असे म्हणून शिवीगाळ केली. आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ करीत आहेत.