देहू : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या देवळात नतमस्तक होऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यातील प्रचारास शुभारंभ केला. खासदार बारणे यांनी मावळ तालुक्याच्या पूर्व भागात प्रचार दौरा केला. चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, माळवाडी, देहूगाव, सुदुंबरे, सुदवडी, इंदोरी, नवलाख उंबरे, आंबी, वराळे, उर्से, परंदवडी, सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, शेलारवाडी, मामुर्डी या गावांमध्ये प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क साधला. प्रचार फेरीची सांगता देहूरोड येथे झाली. मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करून, फटाक्यांच्या आतषबाजीत बारणे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
सुवासिनींनी औक्षण करून बारणे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. भर उन्हात विजय रथावर उभे राहून मतदारांना अभिवादन केले. रणरणत्या उन्हात बारणे यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
खासदार बारणे यांच्या समवेत मावळचे आमदार सुनील शेळके, भाजपचे नेते व माजी मंत्री बाळा भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपाचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे तसेच प्रशांत ढोरे, लहुमामा शेलार, रघुवीर शेलार, प्रवीण झेंडे, अरुणाताई पिंजण, संजय पिंजण, ज्योतीताई पिंजण, बाळासाहेब जाधव, सतीश जाधव, सरला गायकवाड, ज्योती वैरागर, बंडोपंत बालघरे, विनायक जाधव, नवनाथ हारपुडे, कृष्णा दाभोळे, तुकाराम जाधव, सविता पिंजण, गुरुमित सिंग रत्तू, मदन सोनिगरा, विशाल खंडेलवाल, सारिका नाईकनवरे, प्रशासक ॲड. कैलास पानसरे आदी मान्यवर होते.
देहू येथील स्वागत कमानी जवळ खासदार बारणे यांना क्रेनद्वारे मोठा हार घालण्यात आला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात फुलांच्या पाकळ्यांचा वर्षावही करण्यात आला. देहू शहराच्या वतीने नगराध्यक्ष पूजाताई दिवटे, नगरसेवक तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बारणे यांचे स्वागत केले. संत तुकाराम महाराज देवस्थानमध्ये जाऊन बारणे तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक झाले. देवस्थानच्या वतीने अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे (इनामदार), विश्वस्त संजय महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे आदींनी खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे जाऊन संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधीचे बारणे यांनी दर्शन घेतले. गावचे माजी सरपंच माणिक गाडे व विद्यमान उपसरपंच बापू बोरकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत केले. इंदोरी येथील ग्रामदेवता कडजाई मातेच्या यात्रेनिमित्त मंदिरात जाऊन बारणे यांनी आशीर्वाद घेतले. त्यापूर्वी बैलगाडा शर्यतीच्या घाटावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.