डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालमध्ये “वार्षिक क्रीडा स्पर्धां” चे रंगतदार आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा सप्ताह मध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या सप्ताहात अंतर्गत खेळ प्रकारांमध्ये कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि पंजा लढवणे तसेच बाह्य क्रीडा प्रकारात क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, कबड्डी व टग ऑफ वॉर इत्यादी खेळांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी हिरिरीने भाग घेतला व स्पर्धा जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आठवडाभर चाललेल्या या क्रीडा स्पर्धांमुळे कॉलेज परिसरात एकदम उत्साहाचे वातावरण पसरले होते.
प्रथम दिवशी खेळाचे आयोजक डॉ. वैभव वैद्य सर यांनी सर्व उपस्थितांचे आणि संघांचे स्वागत केले. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन डॉ. डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे सर व डॉ. डी. वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संकुल संचालक रिअर ॲडमिरल (निवृत्त) अमित विक्रम सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संकुल संचालक अमित विक्रम सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित केला. उदघाटन प्रसंगी उपस्थित डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे सरांनी आरोग्यदायी जीवनासाठी खेळाचे महत्व पटवून सांगितले तसेच खेळ खेळल्याने आपले शारीरिक व मानसिक आरोग्य कसे उत्तम राहू शकते हे उदाहरणासह स्पष्ट केले.
या सामान्यांचे आयोजनासाठी डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे क्रीडा प्रभारी डॉ. वैभव वैद्य सर, श्री मुकेश मोहिते सर, डॉ. संकेत कदम सर तसेच डॉ. आशिश चिंबाळकर सर आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी कर्तव्यशील भावनेतून परिश्रम घेतले त्याबद्दल प्राचार्यानी त्यांचे कौतुक करत अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा दर वर्षी मोठ्ठ्या प्रमाणात आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित केले.