टास्कच्या बहाण्याने महिलेची तब्बल साडे सहा लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.ही घटना १२ ते १३ एप्रिल २०२४ रोजी थेरगाव येथे घडली आहे.
याप्रकरणी ४३ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून करिश्मा कल्लाजे, अभिषेक तिवारी, शिवाय विराज व लक्ष्मी या नावाने टेलिग्राम अकाउंट असणाऱ्या व्यक्तींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी व्हाट्सअप वरून संपर्क साधला. यावेळी कोणतीही गुंतवणूक न करता केवळ ऑनलाइन टास्क पूर्ण करून पैसे कमविण्याचे अमिष आरोपींनी फिर्यादीला दाखवले.
सुरुवातीला फिर्यादी यांना नफा होत असल्याचे भासवून त्यांच्याकडून वेगवेगळे टास्क करून घेतले. टास्कची रक्कम मिळवण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी अशी एकूण सहा लाख 57 हजार रुपये एवढी रक्कम घेत फिर्यादी यांचे आर्थिक फसवणूक केली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.