देहुरोड: रेल्वे प्रवासी संघ देहुरोड यांच्या वतिने संघाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली देहुरोड रेल्वे स्टेशनवर मशाल मोर्चा काढण्यात आला. रेल्वे प्रवाश्यांनी मशाली पेटवून, त्या हातात घेऊन सवाना हॉटेल चौकापासून ते रेल्वे तिकिटघर पर्यंत रेल्वे प्रशाषना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोरोना काळात ज्या रेल्वे गाड्या बंद केल्या त्या मंध्ये देहुरोडला थांबणारी कोल्हापुर मुबंई सह्याद्री एक्सप्रेह, पुणे मुबंई पॕसेंनजर, दुपारची कर्जत पर्यन्तची शेटल, दुपारची दोन वाजताची लोकल सुरु करणे, सकाळची सिंहगड, किंवा प्रगती एक्सप्रेस थांबविणे, देहुरोड रेल्वे स्टेशनवर सी,सी,टी,व्ही कॕमेरे सुरु करणे, धम्मभुमी देहुरोड व संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनास येथे उतरावे असे लहान बोर्ड आहे ते मोठे व डिजीटल करावे, स्टेशनचे मुख्य प्रवेश व्दार शुशोभीकरण करणे, रस्त्या मधिल टपरी बाजुला करणे अश्या प्रमुख मांगण्यानं सोबत इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात या साठी हा मशाल मोर्चा काढण्यात आला, मशाल मोर्चाचे रुपांतर धरणे आंदोलनात झाले रात्री उशीरा मध्य रेल पुणे चे उप डिव्हीजनल मॅनेजर डॉ. मिंलीद हिरवे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर येत्या मंगळवारी मंडल प्रबंधक पुणे व आंदोलन कर्ते यांची सयुक्त मिंटीग होऊन मागण्या संदर्भात ठोस निर्णय काढण्यात येईल असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन दि. १७/१२/२०२४ सांयकाळी ७ वाजे पर्यन्त स्थगित करण्यात आले, या आंदोलनात मा. नगरसेवक गोपाल तंतरपाळे, सौ सिंधु तंतरपाळे, शिवसेनेचे राजेन्द्र तरस, सुनिताताई चंदाणे, राजेश सपरे, मनसेचे सायबु तेलगु, येशु भंडारी, आर.पी.आय चे राहुल गायकवाड, भिमशक्ती संघटनेचे महेश गायकवाड, पिप्पल्स आर.पी.आयचे अरुण जगताप, हनुमंत राऊत, सामाजीक कार्यकर्ते अशोक सोनवणे, राजकुमार कलिमुर्ती, पंकज तंतरपाळे, ईकबाल शेख, मेघराज तंतरपाळे, अजय बखारिया, किरण कांबळे, शाम सिंधवाणी, सत्यवेल चिन्ना स्वामी, राष्ट्रवादीचे अन्वर तांबोळी, फुलकुमार चंडालिया, जगदिश कनोतिया, इत्यादी उपस्थित होते.