देहूरोड : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर ऊस तोडीच्या कोयत्याने जीवघेणे वार केले आहेत. यावरून देहूरोड पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२४) देहूरोड येथे घडली.
याप्रकरणी ४६ वर्षे महिलेने देऊळ पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. महिलेच्या फिर्यादीवरून देहूरोड पोलिसांनी जिलानी समाझी कुरेशी (वय ४६ रा. शीतलानगर नं. १ देहूरोड) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच राहत्या घरामध्ये पाठीमागून ऊस तोडीच्या कोयत्याने डोक्यावर व हाताच्या कोपऱ्यावर कोयत्याने वार करत जीव मारण्याचा प्रयत्न केला. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून देहूरोड पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक आशिष जाधव पुढील तपास करत आहेत.