पुणे: रात्री ड्युटीवर असताना खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहियानगर पोलिस चौकीच्या वरती असलेल्या रेस्टरूममध्ये पोलिस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
भारत दत्ता आस्मर असे पोलिस कर्मचाराचे नाव आहे. आस्मर यांनी CR Mobile 1 वरील कार्बाईनने चार राउंड फायर करत आत्महत्या केली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. असं काय प्रकार घडला असेल ज्यामुळे आस्मर यांनी हा तीक्ष्ण पाऊल उचलला याचा तपस खडक पोलीस करत आहे. या घटने नंतर खडक पोलीस स्टेशन, आस पास चा परिसर तसेच पुणे आयुक्तालयात तणावाचा वातावरण निर्माण झाला आहे.