आरोग्य परिचारिका / आरोग्य सेवक महिला पात्र असून सुद्धा अपात्र ठरवता नियुक्ती देत नाहीत तर परीक्षा घेता कशाला- प्रदिप थोरवे
आष्टी (अण्णासाहेब साबळे) महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्हा परिषद अंतर्गत २०२३ मध्ये झालेल्या आरोग्य परिचारिका / आरोग्य सेवक महिला पदभरती ही आई.बी.पी.एस. कंपनी मार्फत माहे जुन, जुलै २०२४ दरम्यान महाराष्ट्रभर ऑनलाईन केंद्रावर घेण्यात आल्या. या परिक्षे करिता विवीध जिल्हा परिषदे मार्फत देण्यात आलेल्या जाहिरीतीं मध्ये शैक्षणिक पात्रतेच्या अटी मध्ये ‘ज्यांची अर्हता प्राप्त सहकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परचिर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील असे नमुद करण्यात आलेले होते. त्या प्रमाणे राज्य भरातुन जी.एन.एम. व बी.एस.सी. नर्सिंग झालेल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घ्येण्यात आले व परिक्षाही घेण्यात आल्या. मात्र यानंतर सदर विद्यार्थ्यांची निवड यादी व त्यानंतर कागदपत्र पडताळी बाबतची यादी जिल्हा परिषदांमार्फत लावुन, विद्यार्थ्यांची त्याप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. परंतु या नंतर अचाणक काही जिल्हयामध्ये जी.एन.एम. व बी.एस.सी. नर्सिंग झालेल्या विद्यार्थींना ‘जिल्हा परिषद अधिनीयम १९६७ अन्वये आपणास अपात्र करण्यात येत आहे’ अशी निवड यादी अकोला व जालना इ जिल्हा परिषदां मार्फत लावण्यात आली.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवाप्रवेश (निवड मंडळाच्या सल्याशिवाय) नियम, १९६५ च्या नियम ४ अन्वये करण्यात येणाऱ्या नेमणुकांच्या बाबतीत आणि निवड मंडळाशी संबंधित इतर बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यावेळी विहित केलेली अर्हता धारण करणारे पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत, असे प्रमाणपत्र देतील अशा वेळी संबंधित विभागीय आयुक्त या नियमात अन्यथा उपबंधित केले असेल त्या व्यतिरिक्त, अशा प्रत्येक प्रकरणांमध्ये, जिल्हा सेवांतील पदावरील नेमणुकीसाठी विहित करण्यात आलेल्या [सर्व अर्हता किंवा त्यापैकी कोणतीही अर्हता] कोणत्याही व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या वर्गाच्या संबंधात शिथिल करण्यास नियुक्ती प्राधिकाऱ्यास परवानगी देऊ शकतील.
त्याच जिल्हापरिषद अधिनीयम १९६७ अन्वये सदरील पदा करिता नमुद करण्यात आलेल्या शैक्षणिक अटी मध्ये परिशिष्ठ पाच (दोन) (अ) भारतीय परिचर्या परिषदेने मान्यता दिलेलली बी.एस.सी. परिचर्या ही पदवी धारण करीत असतील किंवा (ब) अर्हता प्राप्त परिचारिका प्रसाविका किंवा अर्हता प्राप्त परिचारीका असतील आणि (तीन) ज्यांची महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झाली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील अशा उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल असे स्पष्ट नमुद करण्यात आलेले आहे. याकारणास्तव कोणतेही जी.एन.एम. व बी.एस.सी. नर्सिंग विद्यार्थीला अपात्र ठरविता येणार नाहीत…
ही परीक्षा ए.एन.एम. व्यतिरीक्त दुसरी कोणासाठी न्हवती तर शासनाने आमचे अर्ज का स्वीकारले.
➢ आरोग्य परिचारीका (आरोग्य सेवक महिला) ज्यांची अहार्त प्राप्त सहयाकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचार्या परिषदेंमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अश्या जे पात्रअसतील. वरील अधोरिकित केलेल्या वाक्यांमूळे असे स्पष्ट होते की महाराष्ट्र परिचार्या परिषदेमध्ये नोंदणी असलेले पात्र उमेदवार आहेत.
➢ तसेच ए.एन.एम. हा मुद्दा जाहीर केला नाही किंवा उच्चशिक्षीत डिप्लोमा डिग्री मान्य नाही याची स्पष्ठता दिली नाही दोन अर्थ असलेली जाहिरात हे समजना कठीण आहे.
तरी ग्रामविकास मंत्री मा गिरीश महाजन यांनी सदरील विषयी सर्व उच्च शिक्षीत बेरोजगार असलेल्या महिलांचा व गुणवत्तेचा विचार करून त्याना सर्वांना निवड यादी प्रमाणे नियुक्ती देवुन उपकृत करावे अशी विनंती आप चे महाराष्ट्र संघटन मंत्री प्रदिप थोरवे यांनी केली आहे.