पिंपरी चिंचवड : पिस्टलचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोन इसमांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही इस्मंकडून देशी बनावटीचे २ पिस्टल २ जिवंत काडतूस ८ ग्राम वजनाची सोन्याची चैन व दोन दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे व त्यांच्यावर असलेले सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.
अजय शंकर राठोड वय २१, रा. पाषाण व ईशान झहीर खान वय २३, रा. दापोडी,मूळ राहणार बिजनोर, उत्तर प्रदेश असे अटक केलेल्या आरोपींची चे नाव असून,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे हिंजवडी पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथकाचे सहा. पो. नि. राम गोमारे व तपास पथकातील अंमलदार सहा. पो. उप नि. नरेश बलसाने, पो. हवा. नरळे, पो. ना. चव्हाण, गडदे, पो.शी. कांबळे शिंदे व पालवे असे दोन वेगवेगळ्या टीम तयार करून हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर व अवैध अग्निशस्त्र व घातक हत्यार जवळ बाळगनाऱ्या इसमांनवर कारवाई करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे प्रभारी, सहा. पो.नी. राम गोमारे यांना माण फेज ३ हिंजवडी येथे सहा.पो. उप नी. नरेश बलसाने यांना सुच ब्रिज खाली येथे वेगवेगळ्या दोन्ही सम गावठी कट्टे घेऊन येणार असले बाबतची गुप्त माहिती प्राप्त झाली असता त्यांनी दोन वेगवेगळ्या टीम करून मान फेस थ्री हिंजवडी व सुच ब्रिज खाली सापळा लावून दोन्ही समानता ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदरचा मालमत्ता जप्त केला आहे. शंकर राठोड वझेशन खान हे एकमेकांचे मित्र असून त्यांनी दोन्ही मोटरसायकल बावधान वस्तू येथून चोरी केल्या असल्याच्या तपासात निष्पन्न झाला आहे दोघांना पोलीस कोठडी रिमांड मध्ये असताना कौशल्य पूर्वक तपास केला असता त्यांनी त्यांच्या तीन साथीदारांसोबत मिळून रिवरच्या धाक दाखवून जवळील डोंगरावर एकाचे अपहरण करून त्यांच्या गळ्यातील आठ ग्रामपंचायत सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतल्या असल्याचा देखील निष्पन्न झाला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ – बापू बांगर, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग – विशाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषिकेश घाडगे तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गदडे, कारभारी पावले, दत्ता शिंदे, अमर राणे, ओम प्रकाश कांबळे व सागर पंडित यांनी केली आहे.