पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असताना हि विनापरवानगी शहरात शास्त्र घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलिस गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकले आहे. अटक केलेल्या आरोपीकडून एक कोयता जप्त केला आहे. ही कारवाई मुळशी तालुक्यातील कासारसाई परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे करण्यात आली.
चैतन्य उर्फ संदीप परशुराम मानके (वय-२२ रा.अण्णाभाऊ साठेनगर, कासारसाई, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार प्रदीप गोरखनाथ गोडांबे यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीवर आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली की, तडीपार असलेला गुन्हेगार चैतन्य उर्फ संदीप माने हा कासारसाई परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर येथील त्याच्या घरा समोर थांबला आहे. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो सध्या तडीपार आहे. तडीपार असताना देखील तो हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत होता.
आरोपी संदीप मानके याला पोलीस उपायुक्त परिमंडळ २ यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. त्याने कोणतीही परवानगी न घेता शहरात फिरत होता. त्याच्याकडून एक हजार रुपयांचा लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.