पुणे : सोशल मीडियावरील इंस्टाग्राम या अँप वर झालेल्या ओळखीतून तरुणी आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचारा होत असल्याच्या घटनांमध्ये दिवसोंदिवस वाढत होत आहेत. एका तरुणाने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत इंन्स्टाग्रामवर ओळख केली. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गुरुवारी (दि.३०) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून दत्तात्रय बाबुराव शिंदे (वय-२२ रा. तुकाईनगर, वडगाव, पुणे) याच्यावर भा.दं.वि. कलम ३७६/३, ३७६/२/एन, ३५४, ३२३, ५०६, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडीत मुलीची फेब्रुवारी २०२३ मध्ये इंन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला धमकी देऊन लगट केले. मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊ आरोपीने घरी येऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवले. तसेच तिला धमकी देऊन सिहंगड किल्ला परिसरात नेऊन अत्याचार केले. पिडीत मुलीने त्याला नकार दिला असता आरोपीने तिला मारहाण करुन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.