शिवाजीनगर : केबल व्यावसायिकाला मारहाण करुन त्याच्या खिशातील पैशे जबरदस्तीने चोरुन केबलच व्यवसाय करण्यासाठी दर महिन्याला दोन हजार रुपये खंडणीची मागणी केली. हा प्रकार शिवाजी नगर येथील जुने बसस्टँड समोरील हॉटेल मध्ये सोमवार (दि.३) रोजी घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
तौफिक सलीम शेख, भारत राजु शिंदे, समीर राजु शिंदे (रा. शिवाजीनगर, पुणे) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३९२, ३९४, ३८४, ३८७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात साजीद नजीर शेख (वय-२२ रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेसन समोर, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा शिवाजीनगर परिसरात केबलचा व्यवसाय आहे. सोमवारी दुपारी फिर्यादी शिवाजीनगर जुने एसटी स्टँड समोरील हॉटेलमध्ये मित्रासोबत जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी हॉटेलमध्ये आले. त्यांनी फिर्य़ादी यांना इराणी वस्ती आणि शिवाजीनगर परिसरात केबलचा व्यवसाय करायचा असेल तर दरमहिन्याला दोन हजार रुपये द्यावे लागतील, पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. तसेच तू आम्हाला पैसे का देत नाही असे म्हणत हातातील कड्याने मारहाण करुन फिर्यादी यांच्या खिशातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.