पुणे : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देऊन तिला जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका युवकावर बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत आरोपीच्या व पीडितेच्या घरी घडला आहे.
याबाबत २७ वर्षीय तरुणीने शुक्रवारी (दि.१२) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन कुशल राजेश प्रधान (वय-३२ रा. स्नेह कुंज अपार्टमेंट, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) याच्यावर भा.दं.वि. कलम ३७६, ३७६/२/एन, ४१७, ५०४, ५०६ सह अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व आरोपी पुण्यातील एका बँकेत नोकरी करतात. एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांची ओळख होऊन मैत्री झाली. कुशल प्रधान याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्याने मुलीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसचे तिच्या मुंढवा येथील घरी जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मुलीने कुशल याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने तिला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पीएसआय सुधा चौधरी करीत आहेत.