पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा बदल झाल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे. विक्रम कुमार यांची मुंबई एमएमआरडी विभागात बदली करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली होती.तसेच पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची राज्य होमगार्डचे महासमादेशकपदी बढती देण्यात आली होती. त्यांच्या जागी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या बदलीच्या चर्चांना जोर धरु लागल्या होत्या.
महापालिका आयुक्त आणि प्रशासक म्हणून विक्रम कुमार हे गेल्या पावणेचार वर्षांपासून पुणे महापालिकेचं कामकाज पाहिलं. या काळात पालिकेत नगरसेवक नसल्यानं त्यांनी कुठलेही धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. आता त्यांच्या जागी राजेंद्र भोसले हे प्रशासकाची भूमिका बजावणार आहेत.