पुणे येथील नामांकित हॉस्पिटलने स्वतःच्या आर्थिक हितापोटी केला वृद्ध महिलेच्या जिवाशी खेळ
संजीवनि विटा लाइफ (मेडी पॉइंट) हॉस्पीटल मधील डॉ. किशोर मोडखरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी – पोलिस हवालदार कैलास लबडे यांची मागणी…
‘पुणे येथील औंध या ठिकाणी असलेल्या संजीवनि विटा लाइफ (मेडी पॉइंट) हॉस्पीटल मधील डॉक्टर किशोर मोडखरकर यांनी आर्थिक हितापोटी माझी आई जनाबाई बंसीलाल लबडे (वय ७३ वर्ष) यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे वर्तन केल्यामुळे त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात यावी’ अशी मागणी पोलीस हवालदार कैलास लबडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे. यासंधर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भा.वी. कांबळे पत्रकार कक्षात त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती त्या दरम्यान लबडे पत्रकारांशी बोलत होते.
या वेळी लबडे म्हणाले की, त्यांच्या आईचा उजवा पाय ७ महिन्यापूर्वी उच्च शुगर मूळे घुडग्याखालुन कापलेला आहे. त्याच पायावर दि. २४ फेब्रूवारी रोजी पडल्यामुळे त्यांना संजीवनि विटा लाइफ (मेडी पॉइंट) हॉस्पीटल औंध येथे दाखल करण्यात आले होते. एक्सरे काढला त्यावेळी समजले की मांडीच्या हाडाला हेयर लाइन फ्रैक्चर आहे, मात्र हॉस्पीटल मधील डॉक्टरांनी ऑपरेशन करून प्लेट टाकावी लागेल असे लबडे यांना सांगितले. गुडघ्या खालून कापलेल्या पायाची जखम भरली नसल्याने व वय ७३ असल्याने लबडे कुटुंबीयांनी सादर प्रक्रियेला नकार दर्शविला. त्यावेळी हॉस्पीटलमधील सीनियर डॉक्टर किशोर मोडखरकर यांनी भेटायला बोलवून ऑपरेशन करुण प्लेट टाकली तर दीड महिन्यात आईचा पाय बरा होईल पण जर फक्त प्लास्टर केले तर पाय बरा होन्यासाठी ४ ते ५ महीने लागतील असे सांगितले. आईचा पाय खालुन कापलेला आहे त्यामूळे तिला चालता तर येतच नाही; त्यामूळे तिला प्लास्टर करा असे लबडे कुटुंबीयांनी सुचविले असता डॉक्टरांनी त्यांच्या आईला ऑपरेशन थियेटर मध्ये घेउन गेले.
पायाला प्लास्टर लाऊन बाहेर आणले त्यावेळी डॉक्टरने विचित्र प्रकारे प्लास्टर मधुन एक इंग्रजी V आकारचे लाकुड मांडीखालून बाहेर काढलेले दिसून येत होते. त्यानंतर लबडे यांच्या आईने सांगीतले की ऑपरेशन थियेटर मधे मोडखरकर डॉक्टर व त्यांच्या टीम ने तिचा पाय एका बाजुला खुप वेळा पिरगळा आहे. जवळपास १०-१५ मिनट ते सर्व जन पाय पिरगळत होते बहुतेक त्यान्नी माझा पाय तोडला आहे असे सांगितले.
नंतर आईच्या पायाचा एक्सरे काढला तर त्यात आईच्या मांडीच्या हाडाचे दोन टुकडे झ्हाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे लवकर ऑपरेशन करा असे मोडखरकर यांना सांगीतले. परंतु त्यावेळी ते बोलले की ‘ऑपरेशन ला ४-५ दिवस लागतील, कारण आईच्या मांडीच्या हाडाच्या आतुन एक रॉड आणि बाहेरून एक रॉड टाकावा लागेल तसेच वरच्या आणि खालच्या बाजुला अश्या दोन प्लेट पण टाकाव्या लागतील त्या पुण्यात भेटत नसल्यामुळे दिल्लीवरुन ऑर्डर देउन मागवाव्या लागतील. त्याची किमत एक लाख रुपये असून ऑपरेशन साठी वेगळे डिड-दोन लाख रुपये लागतील, असे सांगितले. तरी आईच्या ऑपरेशन ला आम्ही होकार दिला. त्यावेळी मोडखरकर डॉक्टर बोलले होते की,आईचा जो पाय ७ महीने आधी कापला तो चुकीचा कापलेला असल्याने अजून ती जखम भरलेली नाही. नंतर कृत्रिम पाय लावला तरी चालायला त्रास होइल त्यामूळे तिच्या मांडीचे ऑपरेशन करताना तीचा पाय ५-६ इंच वरून कापून देतो.ज्यानी पाय कापला ते डॉक्टर नाफाडे यांना बोलावले असता त्यांनी मोडखरकर चुकिचे बोलत असल्याचे सांगितले.
आईच्या पायाची एंजोग्राफी आणि एंजॉप्लास्टी केली मात्र हॉस्पिटल प्रशाशनाने विमा कंपनीला ह्दयाची एंजोग्राफी आणि एंजॉप्लास्टी झाली असा खोटा रिपोर्ट दिला त्यामुळे आईचा एडमिट होताना मंज़ूर झालेला इन्शुरन्स क्लेम रद्द झाला. दोन लाख रुपये भरा नाही तर ऑपरेशन होणार नाही असे सांगितल्यामुळे हॉस्पिटल व डॉक्टर जास्तीचे पैसे उकळण्यासाठी जाणून-बुजून त्रास देत असल्याचे आम्हाला लक्षात आल्याने ऑपरेशन साठी डॉक्टर बदलण्यासाठी आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरला सांगितले.
डॉक्टर कपिल साऊजी यांनी ऑपरेशनचे काम हातात घेतल्यामुळे त्यांनी तपासण्या केल्या. त्यांनी आधीच्या डॉक्टरने केलेल्या चुका सांगून याचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. ऑपरेशनसाठी जवळपास १ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगीतले. आमचा भाचा निलेश चव्हाण हेल्थ इन्शुरन्स कंपनीत एरिया हेड असल्याने त्याला बोलावले असता दोन तासात हॉस्पिटलने इन्शुरन्स मंजूर केला.
घडलेला प्रकार हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट च्या डॉक्टर निलम यांना सांगीतला असता त्यांनी गांभीर्याने घेतला नाही. आईला प्लास्टर साठी ऑपरे…