पुणे: लोकसभेसाठी सध्यातरी भाजपा, काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत दिसत आहे. अनुक्रमे मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, लवकरच या रिंगणात ‘एमआयएम’ (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) ची एंट्री होऊ शकते. त्यामुळे ही लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे. पुण्यात उमेदवारी देण्यासाठी ‘एमआयएम’कडून राजकीय मोर्चेबांधणी सुरू असल्याचे वृत आहे.
महापालिकेच्या राजकारणातील एका माजी पदाधिकाऱ्याला पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. याबाबत ‘एमआयएम’कडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु, पुणे लोकसभेसाठी उमेदवार उभा करण्यासाठी ‘एमआयएम’ च्या हालचाली मात्र सुरू आहेत. ‘एमआयएम’ने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पुणे लोकसभेचे तिनही उमेदवार दिग्गज आहेत. त्यांनी शहर पातळीवर केलेले काम महत्वाचे मानले जाते. ‘एमआयएम’कडून कोणाला उमेदवारी देण्यात येते हे आता पहावे लागणार आहे.