पुणे: दि. ७ ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या, पुणे जिल्हा परिषद येथील बेमुदत धरणे आंदोलनास किसानसभेच्या वतीने जाहीर पाठींब. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मौजे आंबेगावाला बोरघर ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी किसान सभेच्या वतीने पुणे जिल्हा परिषद कार्यालय बाहेर किसान सभेच्या वतीने ७ ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. आज या आंदोलनाचा सातवा दिवस असून, या सहा दिवसात प्रशासनाने यांची योग्य दाखल घेतली नाही म्हणून या आंदोलनामध्ये सामील असलेल्या ९० पेक्षा अधिक नागरिकांनी आज केला एक दिवसीय अन्नत्याग.
‘आम्ही भारताचे लोक. जातीचे की धर्माचे यापेक्षा ही आमच्या देशाचे असलेले नागरिक,
या नागरिकांना कोणत्याच नागरी सुविधा मिळत नसतील व साधी जन्म- मृत्यूची नोंद ही होत नसेल, त्यांना कोणतीच ग्रामपंचायत नसेल तर हा अन्याय आहे. राज्यशासनाचा निषेध म्हणूनच आज दि. ९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस आमचा अन्नत्याग’ असे यावेळी किसान सभेच्या वतीने सांगण्यात आले. सोबतच मौजे आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र, आंबेगाव कातकरी वस्ती, हे बोरघर, ता. आंबेगाव, पुणे या ग्रामपंचायतला जोडलीच पाहिजे. अशी ठाम अपेक्षा देखील या वेळी आंदोलन कर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.