पिंपरी – रोजा सोडण्यासाठी फळे घेण्यासाठी थांबलेल्या युवकावर चार जणांनी हल्ला करुन चाकूने वार केले. हा प्रकार कोंढवा परिसरातील शितल पेट्रोल पंपासमोर असलेल्या फ्रुट स्टॉल येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समीर युसुफ मेमन (वय-३४ रा. असोका म्युज सोसायटी, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन युनुस शेख, सद्धीक शेख, शाहरुख अय्युब खान, अन्वर खान यांच्यावर भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ऐकमेकांच्या परिचयाचे आहेत. फिर्यादी यांनी आरोपीच्या मुलीला गुजरात येथे घेऊन गेल्याचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास समीर याने रोजा सोडण्यासाठी फेळे खरेदी करण्यासाठी गाडी थांबवली. त्यावेळी मुलीच्या घरचे त्याठिकाणी आले. आरोपी युनुस शेख याने समीर याच्या डोक्यात धारदार चाकूने वार करुन जखमी केले. तर सध्दीक शेख याने हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी शाहरुख खान याने हातातील स्टीलच्या कड्याने समीरच्या तोंडावर मारहाण केली.
मुलाला मारहाण करत असल्याचे समजल्यानंतर समीर याचे वडील त्याठिकाणी आले.
त्यांनी मुलीचे वडिल अन्वर शेख यांना मुलाला का मारता अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी शिवीगाळ करुन तुमच्या मुलाचे काय करते ते बघा. त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एच.एच. शेख करीत आहेत.