सोलापूर : बेपत्ता बालकांचा १२ तासाच्या आत पोलिसांनी शोध लावत पालकांना त्यांच्या पालकांच्या सुपुत्र केला आहे. दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास मलिकमा शेख यांचे दोन नातवंड ( बालिका वय १४ व बालक वय १२) हे शाळेत जात आहे असे सांगून घरातून बाहेर पडले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शाळा सुटून देखील सदर बालके घरी आले नाही म्हणून त्यांचे पालकांनी त्यांच्या शोध घेण्यात सुरुवात केली, परंतु सर्वत्र शोधून देखील त्यांना सदर बालके कुठेही त्यांना मिळून आले नाही. कुणीतरी अभ्यास व्यक्तींनी त्यांना फुस लावून पळून नेला अशी शंका पालकांना आली असता त्यांनी सोलापूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिसांनी गु. र. नं. २९३/२०२४ भा.दं.वी. कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून आपली तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली.
पोलिसांनी मुलांच्या शाळेत मित्रांकडे तथा अन्य बालकांचा शोध घेऊन सदर परिसरात सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली परंतु सदर बालके म्हणून आले नाही. तक्रारदार यांचे नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता गोपनीयता माहिती मिळाली की सदर दोन्ही बालके त्यांचे नातेवाईक यांची घरी असल्याचे समजल्याने त्या ठिकाणी जाऊन शोध घेत सदर बालके हे दि. २४ रोजी मिळून आले. सदर पुण्यातील बेपत्ता बालकांचा पोलिसांनी उद्या बारा तासात शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपयुक्त विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग २) – अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, स.फौ. अल्ताफ शेख व पो.ना. राहुल आवारे यांनी केली आहे.